29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर विशेष महाराष्ट्रात ५९ हजार ३१८ नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ५९ हजार ३१८ नवे कोरोना रुग्ण

Related

राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलोख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज तब्बल ५९ हजार ३१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन ३४ हजार ३८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज ९७४ कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत ४८,२६,३७१ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ सक्रीय रुग्ण आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, की आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात.

हे ही वाचा:

तौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

एकीकडे डॉक्टर आणि नसेसचे आंदोलन सुरु असताना उद्धव ठाकरेंची ही मागणी कोड्यात टाकणारी आहे.गोरेगावमधील नेस्को कोवीड सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांनीच आंदोलन पुकारले आहे. कोवीड उपचारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या योद्ध्यांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्या हक्कांसाठी या योद्ध्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रविवार, ९ मे रोजी गोरेगावच्या नेस्को कोवीड सेंटरमधील सगळ्या डॉक्टर्स, नर्सेसनी संप पुकारला.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा