29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाकॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर

कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर

Google News Follow

Related

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज ईडी चौकशी करत आहे. नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणात खर्गे यांची चौकशी सुरु आहे. त्यांना ईडीने त्याला समन्स बजावले होते.

२०१२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. यंग इंडियन लिमिटेड (YIL) द्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडमध्ये काही काँग्रेस नेते फसवणूक आणि विश्वासभंगात गुंतले होते असा आरोप त्यांनी केला होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. स्वामींनी या प्रकरणी सोनिया गांधी, मोतीलाल वोहरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांचा उल्लेख केला आहे.

फेब्रुवारीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींकडून उत्तरे मागितली होती. दोन हजार कोटी रुपयांच्या गांधी परिवाराशिवाय काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा, सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांचीही या प्रकरणात नावे आहेत.

हे ही वाचा:

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

सोमय्या पितापुत्रांचा संध्याकाळपर्यंत निकाल राखीव

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण ? 

नॅशनल हेरॉल्ड हे १९३८ मध्ये आलेलं एक वर्तमानपत्र होतं. पंडित नेहरु यांनी या वृत्तपत्राचा वापर स्वातंत्र्ययुद्धात केला होता. त्यानंतर नेहरुंनी १९३७ मध्ये असेसिएटेड जर्नल बनवलं होतं. ज्यामध्ये तीन वर्तमानपत्रं काढण्यास सुरुवात करण्यात आली. २००८ नंतर असोसिएट जर्नलनं वर्तमानपत्र न छापण्याचा निर्णय घेतला. नंतर ही बाब उघड झाली की, असोसिएट जर्नलवर ९० कोटी कर्जाचा बोजा देखील आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा