29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामासिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पत्रकारांना आता चौकशीसाठी बोलावणार

सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पत्रकारांना आता चौकशीसाठी बोलावणार

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर ८ एप्रिल रोजी काही आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या प्रकरणानंतर राज्यातील पोलीस कारभारवर अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांना याची कल्पना नाही, यावरून अनेक नेत्यांनी टीका केली होती.

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आंदोलक एसटी कर्मचारी धडकणार असल्याची माहिती काही माध्यमांच्या लोकांना आधीच समजली होती. त्यामुळे आंदोलक पोहोचताच माध्यमांचे कॅमेरे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलीस हजर नसल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांवर टीका करण्यात आली होती.

दरम्यान, गावदेवी पोलीस लवकरच काही पत्रकारांना चौकशीला बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंदोलनाच्या दिवशी घटनास्थळी सर्वात आधी पोहचलेल्या पत्रकारांकडून माहिती घेतली जाणार असल्याची माहिती आहे. आंदोलनाची माहिती पत्रकारांना कोणी दिली हे तपासण्यासाठी पोलीस जबाब नोंदवणार आहेत. अटक करण्यात आलेले आंदोलक किंवा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून या आंदोलनाची पत्रकारांना कल्पना दिली होती का हे तपासले जाणार आहे. तसेच या पत्रकारांचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर पूर्वनियोजित हल्ला केला जातो. कॅमेरे पोहचू शकतात मग पोलीस का पोहचू शकले नाहीत. हा हल्ला म्हणजे पोलीस इंटेलिजन्सचे मोठे अपयश आहे.”

हे ही वाचा:

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

तसेच उपमुख्यमंत्री यांनी ही या प्रकरणावर बोलताना म्हटले की, “एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. या घटनेची माहिती पोलिसांना आधी कशी कळली नाही. आंदोलक घटनास्थळी पोहचल्यावर मीडिया लगेचच तिथे पोहचली होती. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. पण मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही,” असे बोलून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा