28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणपंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

त्रिपुराचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. मंत्रिमंडळातील ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली.

Google News Follow

Related

त्रिपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर हा सोहळा पार पडला. सीएम माणिक साहा यांच्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली.

राज्यपाल एसएन आर्य यांनी माणिक साहा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. माणिक साहा यांनी त्रिपुराचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  संताना चकमा, प्रणजित सिंह, सुशांत चौधरी, रतन लाल नाथ, टिंकू रॉय, बिकाश देबबर्मा, सुधांशू दास आणि सुक्ला चरण नोआटिया यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.एक दिवस आधी मेघालय आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा उपस्थित होते.

त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्रिपुरा विधानसभेत बहुमतासाठी ३१ जागांची गरज होती. त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी २५९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपने ५५ जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यांच्या मित्रपक्षांनी पाच जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी एक जागा जिंकण्यात यश आले. या निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले होते.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

निवडणुकीत यावेळी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढवली. ज्यामध्ये डाव्या पक्षांनी ४५ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले. तर काँग्रेसने १३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर प्रद्योत बिक्रम यांच्या टिपरा मोथा या नव्या पक्षाने ४५ जागांवर निवडणूक लढवली होती. टीएमसीने २८ जागांसाठी उमेदवार उभे केले. एक दिवसापूर्वी मेघालय आणि नागालँडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा