23 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरविशेषम्हणून साजरा करतात "जागतिक महिला दिन"

म्हणून साजरा करतात “जागतिक महिला दिन”

महिलांच्या न्याय आणि हक्कासाठीचा दिवस

Google News Follow

Related

आज आठ मार्च “जागतिक महिला दिन”,सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.  १९१० साली कामगार चळवळीतून क्लारा झेटकिन या महिलेमुळे जागतिक महिला दिनाची सुरवात झाली. पण त्याची खरी सुरवात १९०८ साली महिला कर्मचाऱ्यांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यामागे चांगला पगार, कामाचा अवधी कमी करणे आणि मतदानाचा अधिकार या मागण्यासाठी केला होता. त्यानंतर सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची सुरवात केली. साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या ‘क्लारा झेटकिन’ यांनी सर्वात आधी १९१० साली महिलांच्या परिषदेत हि संकल्पना मांडली.

एकूण १७ देशांमधून एकूण १०० महिला त्यावेळेस उपस्थित होत्या. तेव्हा सगळ्यानी क्लारा यांची हि संकल्पना आवडली आणि त्यांनी मान्य पण केली. त्याप्रमाणे पहिला जागतिक महिला दिवस हा १९११ साली ऑस्ट्रिया , डेन्मार्क, जर्मनी आणि स्विझर्लंडमध्ये साजरा केला होता. त्याची शताब्दीसुद्धा २०११ साली साजरी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राने अधिकृत मान्यता १९७५ साली देऊन दरवर्षी एक संकल्पना करायला सुरवात केली. १९९६ साली पहिले घोषवाक्य होते कि, “भूतकाळ साजरा करताना भविष्याची  धोरणे ठरवणे.” आता सगळीकडे महिला दिन हा विविध क्षेत्रातल्या महिलांनी कशी प्रगती साध्य केली या अनुषंगाने असते.

काय आहे महिला दिनाचा इतिहास न्यूयॉर्कमध्ये आठ मार्च १९०८ साली वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी एकत्रितपणे मोठी ऐतिहासिक निदर्शने केली होती. कामाच्या जागी सुरक्षितता आणि दहा तासांचा कामाचा दिवस अशा मागण्या केल्या आहेत. याशिवाय लिंग, वारणा, शैक्षणिक आणि मालमत्ता पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व च स्त्री पुरुष यांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्या हि केल्या होत्या. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीमुळे क्लारा झेटकिन या अतिशय प्रभावित झालया होत्या. कोपनहेगन इथे १९१० साली दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च १९०८ साली अमेरिकेतल्या स्त्री कामगारांनी केलेल्या त्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लारा यांचा ठराव मंजूर झाला. भारतात मुंबई मध्ये प्रथमच महिला दिन हा आठ मार्च १९४३ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.

हे ही वाचा:

सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला, बारामुल्लामध्ये २ दहशतवाद्यांना अटक

‘वूमन सपोर्टींग वूमन’

विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’

आफताब हा प्रशिक्षित शेफ असल्याने त्याला मांस कसे साठवतात ते ठाऊक होते!

महिला दिन सुरु झाला त्यावेळेस अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. १९१८ साली युकेमध्ये तर १९२० साली अमेरिकेत यासंदर्भातील कायदा पास झाला. ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळावा म्हणून विमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन या पक्षाने महत्वाचे योगदान दिले आहे. याच संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या , पांढऱ्या आणि हिरव्या करण्यात आला होता. आणि म्हणूनच हेच या दिवसाच्या महिला दिनाच्या रंगाचे प्रतीक आहे. जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठतेचे प्रतीक आहे.  हे जागतिक महिला दिनाच्या वेब साईटवर सुद्धा उपलब्ध आहे. तर हिरवा रंग आशेचे प्रतीक तर पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणूनच जांभळा रंग हा महिला हक्क आणि समानतेच्या लढ्याचे प्रतीक आहे. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,884चाहतेआवड दर्शवा
2,019अनुयायीअनुकरण करा
65,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा