29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर धर्म संस्कृती ‘नॉनव्हेज खातात म्हणून मुस्लिमांमध्ये कोरोनाचे कमी बळी’

‘नॉनव्हेज खातात म्हणून मुस्लिमांमध्ये कोरोनाचे कमी बळी’

Related

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा अजब दावा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची बेताल बडबड थांबण्याची चिन्हे नाहीत. आता त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे तो म्हणजे मुस्लिम समाज नॉनव्हेज खातो म्हणून त्यांच्यात कोरोना बळींची संख्या कमी आहे, असे वक्तव्य केल्यामुळे. एका वर्तमानपत्रात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत असा अजब दावा केला.

‘आरक्षण रद्द झाल्याचा ठाकरे सरकारला आनंदच’

कासवाच्या मृत्युप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’

उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी

त्यात गायकवाड म्हणतात की, शक्य असेल तर दोन तीन अंडी, चिकन मटण खायला हवे. मी हे सांगतोय कारण मुस्लिम समाज रोजा असतानाही नॉनव्हेज खातो, त्यामुळे त्यांच्यात कोरोना मृत्युचे प्रमाण कमी आहे. आपणही समर्थकांना असे आवाहन करतो की, उपास तपास कमी करून नॉनव्हेज खायला हवे. कारण उपासा तपासामध्ये आपली प्रतिकार शक्ती कमी होते. ती वाढावी म्हणून माझे हे आवाहन आहे. आज तर देवही कुलुपात बंद आहे. देवाच्या रूपाने डॉक्टर आमच्यासमोर उभे आहेत. देवाचा चमत्कार असता तर कोरोनाचा उद्रेक झाला नसता. हिंदूंमध्ये उपास तपासाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यात कोरोनाने बाधित होण्याचे प्रमाण जास्त असते. तिथे मुस्लिमांमध्ये नॉनव्हेजमुळे कोरोनाने बाधित होण्याचे प्रमाण कमी दिसते, असेही गायकवाड यांचे म्हणणे आहे.

यावर वारकरी संप्रदायातील प्रशांत महाराज यांनी त्यांना फोन करून जाब विचारल्यावर गायकवाड आणि प्रशांत महाराज यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. प्रशांत महाराज यांनी गायकवाड यांना विचारले की, तुमचे पेपरमधील कात्रण वाचले. आम्ही हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेकडे बघतो पण मग असे आवाहन का केले? त्यावर गायकवाड त्यांना म्हणाले की, मी माझ्या समर्थकांना आवाहन केले. तुम्हाला सक्ती केलेली नाही. असे आवाहन केल्यामुळे हिंदुत्व बुडते की काय?  मुस्लिम दोनवेळा नॉनव्हेज खातात त्यामुळे त्यांच्यात करोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे, असे माझे म्हणणे आहे.

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्यानंतर गायकवाड वादात सापडले होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा