30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाकासवाच्या मृत्युप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

कासवाच्या मृत्युप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

एका घरातील खिडकीत ठेवलेल्या कासवाचा २० व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ठाण्यातील बाळकूम येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. याप्रकरणी कापूरबावडी  पोलिस ठाण्यात  कासवाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी

‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

ठाण्यातील माजीवाडा बाळकूम हायलँड हेवन येथील २० मजली कोरल इमारत या ठिकाणी प्रतीक उत्तम चौरे यांनी ‘रेड इयर्ड स्लायडर’ प्रजातीचे कासव पाळले होते. १ मे रोजी हे कासव त्यांनी घरातील खिडकीजवळ ठेवले होते आणि खिडकीच्या काचा उघड्या असल्यामुळे कासव २० व्या मजल्यावरून खाली कोसळून त्यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार इमारतीत सफाई काम करणाऱ्याने प्रतीक यांच्या कानावर टाकली मात्र त्यांनी त्या मृत कासवाला कचऱ्यात टाकून दे अशी सूचना दिली.

सफाई कर्मचाऱ्याने त्या कासवाचे आहे त्या अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो काढून त्या कासवाची विल्हेवाट लावली. त्यानंतर या कासवाचे फोटो त्याच इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाश्याच्या मोबाईलवर पाठवले होते. या रहिवाश्याने हे फोटो जिल्हा पशु कल्याण अधिकारी सुनीष कुंजू याना पाठवून त्यांना माहिती दिली. दरम्यान बुधवारी सुनीष कुंजू यांनी कोरल इमारत येथे कासवाच्या मृत्यूची खात्री करून हे कासव प्रतीक चौरे यांनी पाळले होते याची खात्री केल्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. कापूर बावडी पोलिसांनी गुन्हा सतीश चौरे यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा