28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणशिवसेना म्हणजे, लग्न आमच्याशी आणि मंगळसूत्र दुसऱ्यावरच घातले

शिवसेना म्हणजे, लग्न आमच्याशी आणि मंगळसूत्र दुसऱ्यावरच घातले

Google News Follow

Related

आमदार सुरेश धस यांची खरमरीत टीका

जनतेने भाजपा आणि शिवसेनेला निवडून दिले, पण आज शिवसेनेची अवस्था अशी आहे की, लग्न आमच्याशी केले, पण मंगळसूत्र दुसऱ्याच्या गळ्यात. मंगळसूत्र गळ्यात घालण्याची वेळ झाली तेव्हा नवरी गेली पळून. आता आम्ही काय करावं, अशा शब्दांत भाजपा आमदार सुरेश अण्णा धस यांनी शिवसेनेवर शरसंधान केले. बीड येथे झालेल्या मराठा आरक्षण मोर्चात बोलताना सुरेश आण्णा धस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात आलेले सरकार हे कपटकारस्थानाने आलेले सरकार आहे. जनेतेने निवडलेले सरकार नाही. एकटे देवेंद्र फडणवीस वेगळे पडतात. ज्यांची जात काढली. साडेतीन टक्के म्हणून हिणवलं. त्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिले. त्यांचे अभिनंदन करण्याचे सोडून फेक अकाऊंटवर राष्ट्रवादीचे लोक अमृता फडणवीस यांची अवहेलना करतात. पुरुषांशी भांडा ना बायामाणसांवर बोलायची काय गरज आहे? असा संतापही धस यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

शिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली?

नियतीचा सूड म्हणतात तो हाच

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या

बापरे! एका महिलेला दिले चक्क लसीचे तीन डोस

आपल्या घणाघाती भाषणात धस म्हणाले की, मेटे आमच्या पक्षाचे नेते नाहीत. शिवसंग्रामचा विचार वेगळा आहे. पण त्यांच्या मोर्चात शिवसेनेचे लोक पाठवले मोर्चा बंद करण्यासाठी. घटनेच्या कोणत्या कलमात बसते मोर्चा बंद करण्याचे. विचारच बंद करण्याची ही कोणती पद्धत.

महाविकास आघाडीकडून सातत्याने केंद्राकडे बोट दाखविले जाते, त्यावरही धस यांनी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले की, प्रतिघात सिनेमा तुम्ही पाहिलाय का? त्यातील एक पात्र प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रीय कमिटी को पूछ के बताता हूँ असे म्हणत असतो. हाच संवाद महाविकास आघाडीला लागू पडतो. राज्यात लस उपलब्ध नाही, केंद्र जबाबदार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, केंद्र जबाबदार. कशा कशाला केंद्र जबाबदार आहे?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा