31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरराजकारण'जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न, बाकी सगळे पॅटर्न भंगारात'

‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न, बाकी सगळे पॅटर्न भंगारात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

Google News Follow

Related

लोकसभेसाठी महायुतीने लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे.सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लातूर दौऱ्यावर होते.लातूर येथील गरुडा चौक या ठिकाणी ही सभा पार पडली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या सभेला हजेरी लावली.मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेला संबोधित करताना विरोधकांवर तोफ डागली.काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्धवस्त करून टाकला. महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी सेट केला आहे. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी दाखवला.

मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. ते खरे असून त्याचा आपण दहा वर्षे अनुभव घेतला आहे. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा:

टी- २० विश्वचषकासाठी भारताचे शिलेदार ठरले; १५ खेळाडूंची घोषणा

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”

‘पंतप्रधान, देवेंद्रजींबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंचा पुन्हा तोल गेलाच’

काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे व्हिजन आहे. त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी टू जी स्कॅम, स्पेस घोटाळा, कोळसा घोटाळा, नॅशनल हॅराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे काम सुरु आहे. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.विरोधक संविधान धोक्यात आल्याचे बोलत आहेत. पण पंतप्रधानांनी संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगितले आहे. जय श्रीराम म्हटल्यावर रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा. तसाच राग आता विरोधकांना येत आहे. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो राम का नहीं, वो किसी काम नही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा