22 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरराजकारणविजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान

विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान

Google News Follow

Related

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्याने अपमान केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर फिरताना दिसत आहे. या व्हिडीओ वरून वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र संताप उमटताना दिसत असून वडेट्टीवार यांनी माफी मागावी असा सूर उमटताना दिसत आहे.

कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी आहे. अशातच आता महाराष्ट्रातून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचे समोर येत आहे. राज्य सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर चढून त्याला हार घालण्याचे कृत्य केले आहे. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगला फिरत आहे. या व्हिडिओमध्ये वडेट्टीवार पाठमोरे उभे असून ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुतळ्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाहीये. अशावेळी ते थेट पुतळ्यावर चढवून पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय

वडेट्टीवार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या विरोधात संतापाची तीव्र लाट उमटताना दिसत आहे. राज्यातील समस्त शिवप्रेमी जनतेच्या भावना वडेट्टीवार यांच्या कृत्याने दुखावल्या गेल्याचे समोर येत आहे. तर आपल्या या कृतीसाठी मंत्री विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राची माफी मागणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. कर्नाटकमधील घटनेनंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आक्रमक होत कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन करताना दिसत होते. कर्नाटकचे कृत्य करणारा काँग्रेस कार्यकर्ता असला तरीही भाजपा विरोधात आरोळी उठवताना राज्यातील महा विकास आघाडीचे नेते दिसत होते. पण आता त्यांच्याच आघाडीतील एका नेत्याने शिवरायांचा अपमान केल्यामुळे या सगळ्या नेत्यांची पुरती गोची झालेली पाहायला मिळत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा