30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियासोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

Google News Follow

Related

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यापासून त्यांनी महिलांवर अनेक बंधने लादली आहेत. आता तालिबान्यांनी नवीन फतवा काढला असून त्यानुसार महिलांना कुठेही दूरचा प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या ओळखीचा एखादा पुरुष सदस्य सोबत असणे बंधनकारक असणार आहे. तालिबान अधिकाऱ्यांनी रविवारी हा फतवा काढला असून एकट्या महिलेला ओळखीचा पुरुष सोबत असल्याशिवाय प्रवासाला परवानगी नाही.

“४५ मैलापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांसोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचा पुरुष सदस्य नसल्यास त्यांना प्रवासाला परवानगी देऊ नये,”  असे मंत्रालयाचे प्रवक्ते सादेक अकीफ मुहाजिर यांनी रविवारी २६ डिसेंबर रोजी एएफपीला सांगितले.

तसेच वाहन मालकांनी आणि चालकांनी चेहरा न झाकणाऱ्या महिलांना त्यांच्या वाहनात प्रवेश द्यायचा नाही, असा आदेशही दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये १५ ऑगस्ट रोजी सत्तापालट झाल्यावर तालिबान्यांनी आपण महिलांना त्यांचे सर्व अधिकार देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता काबीज केल्यावर काहीच दिवसात तालिबान्यांना स्वतःच्या आश्वासनांचा विसर पडला आणि त्यांनी महिला, मुलींवर बंधने लादण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय

सावरकरप्रेमींचा विजय; सावरकर स्मारक अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित यांची बहुमताने निवड

सार्वजनिक क्षेत्रातील अनेक महिलांना कामावर परत येण्यापासून रोखण्यात आले. मुलींना एकत्र मुलांबरोबर शिकता येणार नाही. सरकारी कामात महिलांना स्थान नाही, असे अनेक फतवे तालिबान्यांनी काढले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना महिला कलाकारांची नाटके आणि मालिकांचे प्रक्षेपण बंद करण्यास सांगितले. तसेच महिला टीव्ही पत्रकारांना सादरीकरण करताना डोक्यावर स्कार्फ घालण्याचे आदेश दिले होते.

तालिबान्यांचा हा नवीन आदेश म्हणजे महिलांना कैदी बनवण्याच्या दिशेने चाललेले पाऊल आहे, असे महिला हक्क गटाच्या सहयोगी संचालक हेदर बार यांनी एएफपीला सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा