29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणपटोलेंचा पत्रव्यवहार, मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस मंत्र्याचीच तक्रार

पटोलेंचा पत्रव्यवहार, मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस मंत्र्याचीच तक्रार

Related

महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याची तक्रार केली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या खात्यात गैरकारभार होत असल्याकडे पटोले यांनी लक्ष वेधले आहे. काँग्रेस पक्षाच्या मंत्र्याच्या खात्यात होत असलेल्या घोळाकडे पटोलेंनी बोट दाखवले आहे. तर त्या खात्यात पदाचा दुरुपयोग होत असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे. या सगळ्याचा परिणाम आगामी काळात महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर होणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे. एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रात राज्याची वीज निर्मिती कंपनी महाजनेकोमध्ये घोटाळा होत असल्याचे म्हटले आहे. कोळसा पुरवठा आणि कोळसा निविदा प्रक्रियेत गैरमार्गाचा वापर तसेच पदाचा गैरवापर करून काम केल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

हे ही वाचा:

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

त्यामुळेच या कामाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तशी विनंती करणारे पत्र पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पाठवले आहे. तर या पत्राची प्रत शासनातील काही सचिव तसेच खजिन महामंडळाचे चेअरमन यांना पाठवण्यात आली आहे. पण ज्या ऊर्जा खात्यासाठी या निविदा काढण्यात आल्या त्या खात्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांना मात्र या पत्राची परत पाठवण्यात आलेली नाही.

त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह हे चव्हाट्यावर आल्याचे म्हटले जात आहे. पटोले यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत एबीपी माझाने दिलेल्या बातमीचे खंडन केले आहे. एबीपी माझाने दिलेली बातमी ही पूर्णपणे असत्य आणि चुकीचे असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे तर आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडर बाबत असून या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही असा दावा पटोले यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा