31 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामा‘पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंगशी देशमुखांचा संबंध होता’

‘पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंगशी देशमुखांचा संबंध होता’

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या चौकशीतून आता अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या हे दोघेही ईडीच्या ताब्यात आहेत.

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे संजीव पालांडे यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान मान्य केलं, की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा हात होता. त्या अनुषंगानेच ईडीने या दोघांचीही कोठडी वाढविण्याची मागणी केली. ईडीने विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग) न्यायालयात हे स्पष्ट केले की, पालांडेने अशी कबुली दिली आहे की, ४ मार्चला पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यात बारवरील निर्बंधांबाबत चर्चा झाली. ईडीने याबाबत म्हटले आहे की, हे पोलिस अधिकारी, संजीव पालांडे आणि अनिल देशमुख यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी या दोघांची अधिक चौकशी आवश्यक आहे.

छापेमारीदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक पुरावे हस्तगत करण्यात आलेत त्यामधूनही ही बाब स्पष्ट होताना दिसते आहे.तपासादरम्यान काही पोलिस अधिकाऱ्यांचे संजीव पालांडे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच कनेक्शन उघड होताना दिसते आहे, असेही ईडीचे म्हणणे आहे. ही पैशांची साखळी शोधण्यासाठी आरोपींचे इन्कम टॅक्स डिटेल्स आणि बँक स्टेटमेंट्स आम्ही काढतोय आणि नंतर ते पडताळणार आहोत, असेही ईडी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

प्रशांत कारुळकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डससह तीन पुरस्कार

अजित पवारांच्या मामाचा कारखाना जप्त

आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट केले

या प्रकरणातले काही संशयित जाणूनबुजून चौकशीसाठी गैरहजर राहत आहेत जेणेकरून तपास लांबावा. (ईडीचा देशमुखांवरून रिमांडमध्ये दावा). देशमुख यांना दोन समन्स बजावण्यात आले, पण त्यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. ईडीचे म्हणणे आहे की, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका आहे शिवाय ते बड्या नेत्याच्या संपर्कात होते. संजीव पालांडे अजून महत्त्वाचे खुलासे करू शकतात. ते थेट देशमुखांच्या संपर्कात होते त्यांना सगळ्या प्रकारची कल्पना आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा