28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणउद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार? शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही

उद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार? शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेचा आपल्या शैलीत घेतला समाचार. ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल

Google News Follow

Related

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? अशी सणकून टीका केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नारायण राणे विधिमंडळात आले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार?. हात वर केला की, खाली आणायला ३ मिनिटे लागतात. शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, अशा शब्दात नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे.

उद्धव ठाकरे यांची कोकणात खेड येथे सभा झाली होती. यसभेला झालेल्या गर्दीवरून जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर राणे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभा विराट नव्हती. त्या सभेत स्थानिक लोकं नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांना काय बोलता येतं? राज्याचा विकास, जनता, जनतेच्या प्रश्नाबद्दल काय बोलता येतं? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. काय दिलं कोकणाला? त्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं असा घणाघात राणे यांनी केला.

शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही. उरलेले १५ आमदारही त्यांच्या हातात राहणार नाही. पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, २० पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा जोरदार हल्ला नारायण राणे यांनी चढवला.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली
“शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानफडातही मारलेली नाही. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फिरले काय? ते लोकांमध्ये असे व्यक्ती नाही. लोकांमध्ये जावून प्रभावित होईल असे ते नाही. त्यामुळे ही आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली आहे. भास्कर जाधव कोण आहे? शिव्या दिल्या किंवा नाचून दाखवलं म्हणजे झालं का? तसं महाराष्ट्राच्या लोकांना अभिप्रेत नाही. अरे उद्धव कुणाचीही जीभ हासडतो, स्वत:ची जीभ सांभाळ. अशी पाळी आली. असा फिरत राहिलास तर ती पण जागेवर राहणार नाही अशा शब्दात राणे यांनी सुनावले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा