28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारण'कशाला राजकीय बोलायला लावता?', देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धू तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देऊनही अवकाळीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीची माहिती देतांनाच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Google News Follow

Related

अवकाळी पावसामुळे राज्यात राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धूळवाडीच्याच दिवशी तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. पण तरीही अवकाळीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारच्यावतीने निवेदन केलं. त्याच वेळी विरोधक आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून आले. कशाला राजकीय बोलायला लावता? हा राजकीय विषय नाहीये अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. त्यावर छगन भुजबळ, नाना पटोले यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यावेळी  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर स्थगन प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर निर्णय देऊन त्यावेळी बोलण्याची संधी देईन असे सांगितले. पण विरोधकांचे समाधान झाले नाही.नाना पटोले यांनी पुन्हा एकदा या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. नाना पटोले आणि छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. त्याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले , “काल नुकसान झालं की आज भरपाई देता येत नाही. तुम्हालाही माहिती आहे की, पंचनामे करावे लागतात. त्यामुळे पंचनामे झाले की आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करू. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे”, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या या उत्तरानंतर विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर फडणवीस यांचा पारा चढल्याचे बघायला मिळाले. आता आलेली माहिती दिली आहे. अजून माहिती येणार आहे. एवढी घाई करू नका. मग आता मला बोलावं लागेल की, मागच्या काळात चक्रीवादळ आलं, त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाहीत. कशाला पॉलिटिकल बोलायला लावता? राजकीय विषय नाहीये हा. हा विषय शेतकऱ्यांचा आहे. याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली ही सगळी माहिती आहे. मदतीसंदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवले आहेत. या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन सगळं निवेदन केलं जाईल अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

८ जिल्ह्यांत साधारणपणे १३ हजार ७२९ हेक्टर नुकसान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या वतीने निवेदन सादर केलं. सरकारची भूमिका सभागृहात मांडतांना फडणवीस म्हणाले “अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा मांडला. शासनाने यासंदर्भातील माहिती तात्काळ मागवली आहे. एकूण ८ जिल्ह्यांत साधारणपणे १३ हजार ७२९ हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागामध्ये ७६० हेक्टरवर काजू आणि आंब्याचं नुकसान आहे. नाशिक जिल्ह्यात कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या भागातमध्ये २ हजार ६८५ हेक्टर गहू, भाजीपाला, आंबा आणि द्राक्षाचं नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री, सिंदखेडा, शिरपूर ३ हजार१४४ हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई याचं नुकसान झालं आहे. नंदूरबारमध्ये नंदूरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, अक्राणी येथे १,५७६ हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई, आंबा याचं नुकसान आहे.

गहू, कांदा, मका, भाजीपाला असं नुकसान
जळगावमधील भुसावळ आणि धरणगाव येथे २१४ हेक्टर गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसान आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव ४ हजार एकशे हेक्टरवरील गहू, कांदा, मका, भाजीपाला असं नुकसान आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा ७७५ हेक्टरवरील मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा यांचं नुकसान आहे. वाशिम जिल्ह्यातील ४ तालुक्यात ४७५ हेक्टरवरील गहू, हरभरा, फळपिकांचं नुकसान झालेलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी यांनी यावेळी सभागृहाला दिली.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा