28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारण'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या'

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या’

Related

राज्यसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. केंद्रोय मंत्री नारायण राणे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतील नाते उद्धव ठाकरेंनी धुळीला मिळवल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर सिंधुदुर्गात भाजपाने विजयोत्सव साजरा केला, त्यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वीसही आमदार निवडून येणार नाहीत. शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतःला वाघ म्हणवतात, पण प्रत्यक्षात शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नसल्याची राणेंनी टीका केली आहे. तसेच येणारी महापालिका निवडणूक ही भाजपाच जिंकेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे.

यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जेवढी मतं मिळायला हवी होती, तेवढी मत आघाडीला मिळालेली नाहीत. उद्धव ठाकरेंना सांगायच आहे की, सत्तेला यायला १४५ मते लागतात, तुम्ही अल्पमतात आलेले आहात. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. सत्तेवर राहायचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू

शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!

भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक

‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही राणेंनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीपूर्वी काही जण बढाया मारत होते, तीन जागा काढणार, भाजपाची मत फोडणार, मात्र प्रत्यक्षात काय झाले? असा सवाल त्यांनी केला आहे. संजय राऊत तर काठावर आलेत, आमच्या हातातून वाचले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा