22 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरराजकारण'ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार'

‘ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार’

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नरेश म्हस्के यांची टीका

Google News Follow

Related

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते, त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे. ही केवळ लाचारी आहे, अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. उत्तर भारतीयांमध्ये सहानभूती निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी हा दौरा काढला असल्याचेही म्हस्के म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. तेजस्वी यादव यांनी ठाकरेंना महाराष्ट्रात येऊन भेटायला पाहिजे, असं म्हस्के म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जातात, त्यावेळी हे लोक मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात. आता तर आदित्य ठाकरे एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला चालले आहेत, अशी खोचक टीका म्हस्के यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जातं असल्याची माहिती आहे. या भेटीबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदींसह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा