24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरराजकारणहिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना नवी नियमावली

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना नवी नियमावली

राज्यसभा कार्यालयाकडून यादी जाहीर

Google News Follow

Related

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या खासदारांसाठी विशेष सूचनांसह नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. कोणतेही राज्यसभा खासदार ६० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे.

याशिवाय आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे.

राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा!

टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

काय आहे नवी नियमावली?

  • राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कोणतीही प्रसिद्धी करण्यात येऊ नये.
  • राज्यसभा सभापती नोटीस मंजूर करत नाही. इतर खासदारांना कळवत नाही तोपर्यंत ती नोटीस सार्वजनिक करू नये.
  • सभागृहात धन्यवाद, आभार, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देऊ नयेत.
  • सभापती यांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका करू नये.
  • सभागृहात फलक, पोस्टर, बॅनर्स आणायला आणि लावायला बंदी आहे.
  • सभापती यांना सदस्यांनी पाठ दाखवून बाहेर जाऊ नये.
  • सभागृहात दोन सदस्य एकाचवेळी उभे राहू शकत नाहीत.
  • सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये.
  • सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.
  • सदस्यांनी सभागृहात लिखित भाषण वाचू नये.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा