29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण मोदी सरकारच्या बदनामीचा कट धुळीला

मोदी सरकारच्या बदनामीचा कट धुळीला

Related

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पाठवलेले ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत निर्माण करण्यात आलेले व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त चुकीचे आणि निराधार असल्याचा खुलासा केंद्र सरकारच्या माहिती आणि जनसमपर्क विभागाकडून करण्यात आला आहे. राज्यातील काही प्रसारमाध्यमांनी या संबंधीचे वार्तांकन केले होते. तसेच या विषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपसुद्धा करण्यात आले होते. पण अखेर पीआयबीने या प्रकरणातील सत्यता समोर आणली आहे. यामुळे मोदी सरकारच्या बदनामीचा कट धुळीला मिळाल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

कोरोना महामारीच्या सुरवातीला कोणताच देश या महामारीसाठी पूर्णतः तयारीत नव्हता. भारतही याला अपवाद नाही. या महामारीची सुरुवात झाली, त्यावेळी देशभरातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्यंत मर्यादित संख्येने व्हेंटीलेटर्स उपलब्ध होते. एवढेच नाही तर, भारतात अत्यंत कमी प्रमाणात व्हेंटीलेटर्सचे उत्पादन होत होते. आणि परदेशातील अनेक पुरवठादार कंपन्या देखील भारतात मोठ्या प्रमाणात व्हेंटीलेटर्स पाठवण्याच्या स्थितीत नव्हत्या. अशा स्थितीतच, भारतातील व्हेंटीलेटर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील उत्पादकांना “मेक इन इंडिया’ अंतर्गत, व्हेंटीलेटर्सची निर्मिती करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले आणि त्यांना व्हेंटीलेटर्स चे ऑर्डरही देण्यात आली. यातीलाच एक उत्पादक कंपनी म्हणजे ‘ज्योती सीएनसी’

हे ही वाचा:

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

खान मार्केटमध्ये अवैध ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्लाला जामिन नाहीच

शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन

ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे

‘ज्योती सीएनसी’ या कंपनीने तयार केलेले व्हेन्टिलेटर्स औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये, १५० व्हेंटीलेटर्सचा पुरवठा,ज्योती सीएनसी कंपनीने केला आहे. १९ एप्रिल २०२१ रोजी १०० व्हेंटीलेटर्सची पहिली खेप औरंगाबाद इथे पोचली होती, आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मिळालेल्या वितरण यादीनुसार, विविध ठिकाणी हे व्हेंटीलेटर्स पाठवण्यात आले यात अनेक खासगी रुग्णालयांचा समावेश होता. यापैकी एक खासगी रुग्णालय म्हणजे जीएमसी रुग्णालय.

पण जीएमसी रुग्णालयात बसवण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स काम करत नसल्याची तक्रार कंपनीला २३ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. या रुग्णालयातील आठ व्हेन्टिलेटर्स काम करत नव्हते. या तक्रारीची दखल घेत ज्योती सीएनसी या विक्रेत्याच्या अभियंत्यांनी सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, आठ व्हेंटीलेटर्सची पाहणी केली. तीन व्हेंटीलेटर्समध्ये रुग्णालयांनी फ्लो सेन्सर इंस्टॉल केलाच नसल्याचे त्यांना आढळले. एका व्हेंटीलेटरमधील ऑक्सिजन सेल सुरु नव्हते, तिथे नवा ऑक्सिजन सेल लावण्यात आला, त्यानंतर व्हेंटीलेटर सुरु झाले.

ज्योती सीएनसीला १० मे रोजी एक फोन आला, ज्यात, दोन व्हेंटीलेटर्स अतिदक्षता विभागात लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी, एक एनआयव्ही (नॉन इन्व्हेसिव्ह मोड) मध्ये  गेल्याने रुग्णाच्या शरीरातील (रक्तातील) ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्याचे काम करू शकत नव्हते.  याची तपासणी अतिदक्षता विभागाच्या बाहेर व्हावी,असे अधिकाऱ्यांनी सूचित केले. त्यानुसार, तपासणी करण्यात आली. या तपासणीत असे आढळले की हे व्हेंटीलेटर योग्यप्रकारे काम करत आहे . रुग्णालय प्रशासनाचे समाधान झाल्यावरच तंत्रज्ञाचा चमू तिथून निघाला. त्यानंतर १२ मे रोजी हे व्हेंटीलेटर पुन्हा एकदा रुग्णाच्या सेवेसाठी एनआयव्ही मोडमध्ये वापरण्यात आले. १३ मे रोजी दुपारी ज्योती सीएनसीला असे कळवण्यात आले की हे व्हेंटीलेटर्स संपूर्ण क्षमतेने पीप सुविधा देऊ शकत नाही. दुपारीच कंपनीच्या तंत्रज्ञ चमूने रूग्णालयाला भेट दिली. मात्र, तोपर्यंत, तेच व्हेंटीलेटर रुग्णासाठी आयव्ही मोडवर पूर्ण क्षमतेने वापरले जात असल्याचे आढळले. हे व्हेंटीलेटर्स रुग्णावरील उपचारात उत्तम काम करत असल्याचे त्यांना आढळले.

शुक्रवार, १४ मे रोजी ही माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक काढून देण्यात आली. ज्यामुळे मेक इन इंडिया योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने पाठवलेले व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याच्या वृत्तांना पूर्णविराम मिळाला.

दरम्यान यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. लेखणी कलम, ठाकरे सरकार नरम… असे लिहिताना मोदी सरकारच्या बदनामीचा कट उधळला असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा