29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण "फॅमिली डॉक्टर"साठी आकड्यांचा आरसा

“फॅमिली डॉक्टर”साठी आकड्यांचा आरसा

Related

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पहिल्या लॉकडाउनपासून गंभीरच आहे. अजूनही महाराष्ट्र कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण तो प्रश्न उपस्थित झाला रे झाला की, राज्यातील महाविकास आघाडीचे नेते भाजपाशासित राज्यांची स्थिती ओरडून सांगत असतात. देशाच्या परिस्थितीवर बोट ठेवतात. पण देशातील आकडे हे राज्यांतील आकड्यांवरूनच तयार होतात, हे ते सोयिस्कर लपवतात. म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आकड्यांचे हे खरे रूप दाखविण्याचा हा प्रयत्न.

हे ही वाचा:

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

तीन आठवड्यांत लसीकरणाच्या टाळीबाज घोषणेनंतर मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण बंद

ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं

भारतातील मृत्यूसंख्या ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची बेरीज असते. आरोग्य हा विषय राज्य सूचीत आहे हे आता सर्व सुशिक्षित लोकांना माहीत झाले आहे. म्हणजे भारताच्या मृत्यूसंख्येची जबाबदारी राज्यांची आहे.

 

आता आपण कालपर्यंतची मृत्यूची आकडेवारी बघू.

 

एकूण मृत्यू २,५४,२२५ आहे.

 

गैरभाजप ६ राज्ये आणि मृत्यू खालीलप्रमाणे

 

महाराष्ट्र          ७७१९१

दिल्ली            २००१०

तामिळनाडू        १६१७८

बंगाल            १२५९३

छत्तीसगड         १०९४१

पंजाब            १०९१८

 

एकूण            १,४७,८३१

 

देशातील एकूण मृत्यूशी तुलनात्मक टक्केवारी ५८.१५%

 

वरील सहा राज्यांची मिळून लोकसंख्या ३६.२० कोटी

 

भाजपशासित राज्ये

 

कर्नाटक           १९८५२

यूपी               १६०४३

गुजरात            ८६२९

एमपी              ६५९५

हरयाणा            ५९१०

उत्तराखंड            ४०१४

 

टोटल               ६१०४३

 

देशातील एकूण मृत्यूशी तुलनात्मक टक्केवारी २४.०१ %

 

वरील सहा राज्यांची मिळून लोकसंख्या ४७.०० कोटी

 

आकडे खोटं बोलत नाहीत.. सर्व डेटा कोव्हीड १९ इंडिया वरून आज सकाळी घेतला आहे.

 

बघा. भाजपशासित ६ राज्यांपेक्षा एकट्या महाराष्ट्रात झालेले मृत्यू जास्त आहेत

 

खरे तर या दुर्दैवी आकडेवारीचा उपयोग कोण चांगला कोण वाईट हे ठरविण्यासाठी करू नये. हे खूप वाईट आहे. पण..हा पण महत्वाचा आहे.

 

देशातील मृत्यूंसाठी सर्व विरोधक, काही पत्रकार, लेफ्ट लिबरल लॉबी एकट्या मोदींना जबाबदार धरत आहेत म्हणून हे क्रिकेटचे उदाहरण दिले. जर तुम्ही मोदींचा राजीनामा मागणार असाल तर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे..

फॅमिली डॉक्टरला आकड्यांचा आरसा दाखवणे गरजेचे आहे..

 

 

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा