30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणजळगाव महापालिकेत राडा

जळगाव महापालिकेत राडा

Google News Follow

Related

जळगाव महापालिकेची आज (बुधवारी) ऑनलाईन महासभा पार पडत आहे. या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निर्णय झाला. तसेच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजपा आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजुर केले.

मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा पार पडत होती. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित आहेत.

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपाचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, ऍडव्होकेट शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपाचे सदस्य आक्रमक झाले.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमतांवर मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा