पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसीय बिहार दौऱ्यावर गुरुवारी पाटणा येथे पोहोचले. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी नव्याने बांधलेल्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांनी केले. ही टर्मिनल इमारत अत्याधुनिक सुविधांनी सजलेली आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आली आहे. ₹१,२०० कोटींच्या खर्चाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) ही इमारत उभारली आहे. येत्या काही वर्षांत या टर्मिनलद्वारे दरवर्षी १ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण टर्मिनलची माहिती घेतली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित होते. उद्घटनानंतर पंतप्रधान मोदी पाटणामध्ये रोड शो मध्ये सहभागी झाले. हा रोड शो पटणा विमानतळ ते बेली रोडमार्गे भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत झाला. या रोड शोसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. स्टेजवर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्र’ यांची अनोखी झलक सादर करण्यात आली, ज्याने राष्ट्रवादाचा संदेश दिला.
हे ही वाचा:
काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त!
तुषार देशपांडे सज्ज आहे इंग्लंड जिंकायला!
झिम्बाब्वेविरुद्ध शानदार शतकांनी इंग्लंडच्या फलंदाजांची ICC टेस्ट रँकिंगमध्ये झेप
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट; दोघे अटकेत
पंतप्रधान मोदी भाजप कार्यालयात प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असून पाटणा विमानतळावर आगमनावेळी बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राज्य सरकारमधील मंत्री आणि एनडीएचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शुक्रवारी विक्रमगंज दौरा
शुक्रवारी पंतप्रधान रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज येथे एक भव्य जनसभा संबोधित करणार आहेत. त्या ठिकाणी ते अनेक विकास योजनांचं उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे एनडीए कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
