गाझियाबादमध्ये एका मुस्लिम महिलेने इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. धर्मांतरानंतर दिल्लीची निदा खान आता वेदिका सिसोदिया झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील एका हिंदू संघटनेने निदाच्या ‘घरवापसी’चे आयोजन केले होते. पती आणि इतरांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सनातन धर्माकडे वळल्याचे महिलेने सांगितले. वेदिका बनलेल्या निदाने म्हटले, सनातन धर्मात महिलांना खूप आदर दिला जातो आणि त्यामुळे हा निर्णय घेतला.
मूळची दिल्लीतील वजिराबाद येथील रहिवासी असलेली निदा खान गेल्या सहा महिन्यांपासून पंचवटी कॉलनीत राहत होती. मुलीने सांगितले की तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करायचा. हिंदू रक्षा दलाने तिला घरी आणण्याचे काम केले. विशेष म्हणजे, हिंदू रक्षा दलाचे राज्य संयोजक गौरव सिसोदिया आणि त्यांच्या पत्नी रेखा सिसोदिया यांनी वेदिकाला दत्तक घेतले.
गौरव सिसोदिया म्हणाले की, मुलीचा एका तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. ऑनलाइनच्या माध्यमातून ती त्याच्या संपर्कात आली आणि प्रेमात पडली आणि लग्न केले. त्या तरुणाने स्वतःला अविवाहित आणि २६ वर्षांचा असल्याचे सांगितले होते, परंतु लग्नानंतर मुलीला कळले की तो आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. मुलीने विरोध केला तेव्हा त्या तरुणाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिच्याशी असभ्य वर्तन केले. यादरम्यान, त्याने मुलीवर त्याचा भाऊ आणि मित्रांसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. या सर्व घटनांमुळे ती त्याच्यापासून वेगळी राहत होती.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले, एकदा मी ठरवलं तर मी स्वतःचंही ऐकत नाही!
२६/११ नंतर ‘लष्कर’ मुख्यालयावर हल्ला न करून काँग्रेसने केला विश्वासघात
गौरव सिसोदिया पुढे म्हणाले, तिच्या घरमालकामार्फत तिच्याशी भेट झाली. या काळात मुलीने तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगितले. त्यानंतर तिला घरी आणून तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (२८ मे) मंदिरात सर्व विधी पार पडल्यानंतर ती निदाची वेदिका झाली.
