31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरराजकारणकाँग्रेस बेकायदा, घुसखोर मुस्लिमांमध्ये संपत्तीचे वाटप करेल!

काँग्रेस बेकायदा, घुसखोर मुस्लिमांमध्ये संपत्तीचे वाटप करेल!

‘संपत्ती पुनर्वितरणा’च्या आश्वासनावर पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी वचननाम्यात ‘संपत्ती पुनर्वितरण’ या अति-डाव्या विचारसरणीचा समावेश केल्याबद्दल काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. त्यांचा निवडणूक जाहीरनामा माओवाद्यांची विचारधारा प्रतिबिंबित करतो, अशी टीका मोदी यांनी केली. राजस्थानमधील बांसवाडा येथील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. ‘काँग्रेस पक्ष डाव्या आणि शहरी नक्षलवाद्यांच्या जाळ्यात अडकला आहे. जुन्या पक्षातून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी हे अधोरेखित केले आहे. त्यांनीही काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हेच प्रतिबिंबित करतो, असे म्हटले आहे.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे म्हटले आहे ते गंभीर आणि चिंताजनक आहे. ते माओवादी विचारधारा प्रतिबिंबित करते,’अशी टीका त्यांनी केली. संपत्ती पुनर्वाटपाचे आश्वासन दिल्याबद्दल मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका केली. ‘काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यास भारतीयांचे सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र, मालमत्ता इत्यादींचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या भगिनींकडे किती सोने आहे, सरकारी कर्मचाऱ्यांकडे किती पैसे आहेत हे तपासले जाईल… आपल्या भगिनींच्या मालकीच्या सोन्याचे समान वाटप केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तुमची मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे का? ‘मंगळसूत्रा’तील सोन्याची किंमत हा मुद्दा नाही, ते स्वप्नांशी जोडलेले असते,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुप्रसिद्ध वक्तव्याची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी असा युक्तिवाद केला होता की संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला अधिकार आहे. यावरच पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ‘याचा अर्थ संपत्ती सर्वेक्षण केल्यानंतर ज्यांना जास्त मुले आहेत, अशा बेकायदा स्थलांतरितांना आणि मुस्लिमांना वितरित करतील, ज्यांच्यासाठी मनमोहन सिंग यांनी संसाधनांवर पहिला अधिकार असल्याचे सांगितले होते, याची आठवण मोदी यांनी करून दिली.

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे टॉप पाच फलंदाज

चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

बेंगळुरूच्या लढाऊ बाण्याचे कोलकात्याच्या गंभीरकडून कौतुक!

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला

आदल्या दिवशी, राजस्थानच्या जालोरमध्ये एका सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा खरपूस समाचार घेतला होता. ‘जे लोक निवडणूक लढू शकत नाहीत आणि जिंकू शकत नाहीत ते यावेळी राजस्थानमध्ये आले आहेत,’ अशी टीका त्यांनी केली होती. काँग्रेसच्या ढासळलेल्या स्थितीचा समाचार घेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकेकाळी ४०० जागा जिंकणारी काँग्रेस आता या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा लढवण्यास असमर्थ असून हा पक्ष ‘अस्थिरतेचे प्रतीक’ आहे. देशातील जनता काँग्रेसला त्यांच्या पापांची शिक्षा देत आहे, असेही ते म्हणाले.

‘आजच्या स्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. यापूर्वी राजस्थानने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवले आणि आता आपल्याकडे राज्यसभेत काँग्रेसचे दुसरे नेते (सोनिया गांधी) आहेत. आपण जिंकू शकत नाही हे ज्यांना माहीत होते, त्यांनी शर्यतीतून पळ काढला आणि राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचले. काँग्रेसने ‘परिवारवाद’ आणि भ्रष्टाचाराची कीड पसरवून देश पोखरला. देशातील तरुणांचा काँग्रेसवर इतका राग आहे की त्यांना त्यांचे तोंड पुन्हा पाहायचे नाही,’ अशीही टीका पंतप्रधानांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा