29 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरराजकारणदेशभरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी कार्यक्रमांची रेलचेल

देशभरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी कार्यक्रमांची रेलचेल

देशभरात दिसला प्रचंड उत्साह

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचे दिवसाचे निमित्त साधून देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकराने समुद्र किनारे स्वच्छता मोहीम राबवली. उत्तर प्रदेशमध्ये मोदींच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, राजस्थानसह देशभरात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा सरकारने शनिवारी राज्यातील ३७ समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना प्रमोद सावंत यांनी समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ब्लू इकॉनॉमीला चालना देण्यावर भर दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये पंतप्रधान मोदींच्या जीवनपटावरील फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या या प्रदर्शनाला ‘भारतमातेच्या खऱ्या सुपुत्राची कहानी’ असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठकही उपस्थित होते. याशिवाय अनेक मंत्री आणि सरकारचे उच्चपदस्थ अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

तामिळनाडूमध्ये आजच्या दिवशी जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याचे नाणे भेट देण्यात आले आहे.  चेन्नईचे आरएसआरएम या रुग्णालयात जन्मलेल्या सर्व बालकांना सोन्याचे नाणे भेट म्हणून देण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये दहा दिवसांसाठी तब्बल ५६ इंचची थाळी पुरवली जात आहे. लुटियन्स असं या हॉटेलचं नाव असून तिथे ही थाळी दिली जात आहे. ही थाळी ४० मिनिटांत संपवली तर विजेत्याला केदारनाथ मंदिरात जाण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून कर्नाटक सरकार पंधरा  दिवसांची आरोग्य मोहीम सुरू केली आहे.

हे ही वाचा:

 

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला भाजपाने अनेक कार्यक्रम आयोजित केली आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम निश्चित केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा