28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारण...म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

Google News Follow

Related

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर फर्टिलायझर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) आणि भारतीय वैद्यकीय संशोधनाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात पाच मोठ्या गोष्टी सांगितल्या. ज्यांच्या आधारे त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘संपूर्ण उत्तर प्रदेशला चांगलेच माहिती आहे की, लाल टोप्या असलेल्यांना लाल दिव्याचे महत्त्व होते. त्यांना तुमच्या दुःखाशी काहीही देणेघेणे नाही. घोटाळे करण्यासाठी, आपली तिजोरी भरण्यासाठी लाल टोपी वाल्यांना केवळ सत्ता हवी आहे. लाल टोपी वाल्यांना सरकार आणायचे आहे कारण अवैध धंद्यांना, माफियांना मोकळे रान देण्यासाठी, दहशतवाद्यांना दया दाखवण्यासाठी, त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आणि म्हणूनच लाल टोपी हा तुमच्यासाठी लाल अलर्ट आहे, असे मोदी भाषणात म्हणाले.

योगी सरकारच्या आधी जे सरकार होते त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसे रडवले हे उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक शेतकरी विसरू शकत नाही. हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या रकमेतही महिन्यांचा फरक होता. उत्तर प्रदेशात साखर कारखानदारीबाबत कोणते घोटाळे झाले हे संपूर्ण उत्तर प्रदेशच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे, असे मोदी म्हणाले.

देशात अन्नधान्य असूनही गरिबांना अन्न मिळत नव्हते, असे दिवसही आधीच्या सरकारच्या काळात देशाने पाहिले आहेत. आज आपल्या सरकारने गरिबांसाठी सरकारी गोदामे उघडली आहेत. उत्तर प्रदेशातील सुमारे १५ कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन

बापरे !! आत्महत्येची मशीन??

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

वीज पुरवठ्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशमधील काही जिल्हे व्ही.आय.पी. होते. मात्र योगी सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला व्ही.आय.पी बनवून विद्युतीकरण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे योगीजींच्या सरकारमध्ये आज प्रत्येक गावात वीज मिळत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

यापूर्वीच्या सरकारने गुन्हेगारांना संरक्षण देऊन उत्तर प्रदेशचे नाव बदनाम केले होते. मात्र, आज हे चित्र पालटले असून गुन्हेगार तुरुंगात आहेत आणि गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करत आहेत. म्हणजेच, हे दुहेरी इंजिनचे दुहेरी यश, विकास आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेचा डबल इंजिन सरकारवर विश्वास आहे, असे नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा