31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणआसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरवार, २८ एप्रिल रोजी आसाममधील दिब्रुगड येथे दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी आसाममधील सात नवीन कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन केले आहे. तसेच आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात नवीन कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणीही यावेळी केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘शांतता, एकता आणि विकास रॅली’ला संबोधित करताना ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारचे कौतुक केले आहे.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय (डिफू), पदवी महाविद्यालय (पश्चिम कार्बी आंगलाँग), आणि कृषी महाविद्यालय (कोलोंगा, पश्चिम कार्बी आंगलाँग) या विविध प्रकल्पांची पायाभरणीही केली आहे. हे प्रकल्प ५०० कोटींहून अधिक किमतीचे असून आसाममध्ये या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. यावेळी पंतप्रधानांनी २ हजार ९५० अमृत सरोवर प्रकल्पांनाही सुरुवात केली आहे. आसाममध्ये सुमारे १ हजार १५० कोटी रुपये खर्च करून हे अमृत सरोवर विकसित करणार आहे.

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे. पुढील ३ महिन्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणखी तीन रुग्णालये उभारणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसोबत टाटा समूहाचे मुख्य रतन टाटा देखील उपस्थित होते. या आसाम दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी डिब्रूगड कॅन्सर हॉस्पिटलही राष्ट्राला समर्पित केले आहे.
देश आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, असा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधानांनी डबल इंजिन सरकारचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, दुहेरी इंजिन असलेली सरकारे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या भावनेने काम करतात. आज कार्बी आंगलाँगच्या या भूमीवर हा संकल्प पुन्हा दृढ झाला आहे. आसामच्या शांतता आणि जलद विकासासाठी जो करार झाला होता तो प्रत्यक्षात आणण्यासाठी काम वेगाने सुरू आहे.

हे ही वाचा:

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर

ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट

नाना पटोलेंच्या ठाकरे सरकारला कानपिचक्या

मोदी सरकारच्या सलग दोन कार्यकाळात झालेल्या ईशान्येकडील विकासाबद्दल पंतप्रधान म्हणाले, “२०१४ पासून ईशान्येतील अडचणी कमी होत आहेत, लोकांचे जीवनमान सुधारत आहे. आज, जेव्हा कोणी आसामच्या आदिवासी भागात येतो आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये जातो तेव्हा परिस्थिती बदलत आहे हे पाहून चांगले वाटते.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा