29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियानेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर

नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर

Google News Follow

Related

दहा वर्ष वय म्हणजे लहान मुलांचे खेळण्याचे, बागडण्याचे वय असते. या वयात लहान मुले खेळतात, मजा मस्ती करत असतात. मात्र, दिल्लीच्या एका दहा वर्षाच्या मुलाने आपल्या देशासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अवघ्या दहा वर्षाचा हा मुलगा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संदेश देण्यासाठी २ हजार ५०० किमी सायकलचा प्रवास सुरु केला आहे.

आरव भारद्वाज (१०) असं या मुलाचे नाव असून तो इयत्ता सहावीत शिकतो. आरव याने १४ रोजी मणिपूरमधील मोइरांगतुन प्रवास सुरु केला. मोइरांगतुन प्रवास सुरु करण्याचे कारण म्हणजे, बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याने १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकवला होता. मणिपूरमधून सुरु केलेला प्रवास सध्या तो पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वारला पोहोचला आहे.

याबाबत आरवने सांगितले, ” नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून प्रेरणा घेऊन २ हजार ५०० किमी सायकलिंगचा निर्णय घेतला. बोस यांच्या १२५व्या जयंतीपूर्वी काहीतरी चांगले करण्याची त्यांची इच्छा होती. मी दुसरीत असल्यापासून माझे आजोबा मला स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा सांगत होते. माझ्या आजोबांनी मला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर अनेक पुस्तके दिली आहेत. त्या वेळी मला नेताजी आणि त्यांनी देशासाठी केलेल्या संघर्षाची प्रेरणा मिळाली.”

हे ही वाचा:

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

कारागृहात असताना रवी राणा यांचा वाढदिवस साजरा

Twitter बोलणार मस्क बोली

काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?

पुढे तो म्हणाला, नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल येथे या सायकलिंग मोहिमेचा समारोप होणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा माझा प्रयन्त आहे. तसेच त्याला लष्करात भरती होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, आरवचे बाबा अतुल एम भारद्वाज डॉक्टर आहेत. आरववला प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतः त्याच्यासोबत गेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा