28 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरदेश दुनियानरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त, पुतिन यांच्याकडून स्तुतिसुमने

नरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त, पुतिन यांच्याकडून स्तुतिसुमने

रशियातील कार्यक्रमात पुतिन यांचे भाष्य

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविल्यामुळे भारतातील विरोधकांमध्ये निराशेची लाट आलेली असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या निराशेत आणखी भर घातली आहे. पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त असल्याची टिप्पणी केली आहे.

पुतिन यांनी म्हटले आहे की, मोदी हे सच्चे देशभक्त असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रचंड विकास केला आहे. मॉस्को येथे झालेल्या एका बैठकीत पुतिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुतिन म्हणाले की, भारताने ब्रिटिशांची वसाहत ते आताचा आधुनिक देश अशा दीर्घ प्रवास केला आहे. जगात आज भारताला सर्वच स्तरावर आदर प्राप्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला प्रचंड प्रगती करता आली आहे. ते सच्चे देशभक्त आहेत. मेक इन इंडिया ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना विकासासाठी खूप मोलाची ठरली. त्यामुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे.भारतातील रशियन दूतावासाने पुतिन यांनी रशियन भाषेत केलेल्या भाषणाचे भाषांतर करून त्याचे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

एलॉन मस्क आता ‘ट्विट चीफ’, ताबा मिळताच सीईओंना कंपनीतून बाहेरचा रस्ता

 

पुतिन असेही म्हणाले की, भारत हा केवळ सर्वात मोठा लोकशाही देश नाही तर त्यांच्या प्रगतीचा आलेखही उंचावत आहे. तेच त्यांच्या विकास आणि उन्नतीचे चिन्ह आहे.

पुतिन यांनी भारताशी असलेल्या नात्याविषयी सांगितले की, भारताशी आमचे गेल्या अनेक दशकांचे आपुलकीचे नाते आहे. भारताशी आमचे कोणत्याही मुद्द्यावरून बिनसलेले नाही. आम्ही नेहमीच एकमेकांना आधार दिला आहे, मदत केली आहे. भविष्यातही हे चित्र असेच राहील याबाबत मी सकारात्मक आहे. भारत आणि दिल्ली यांच्यातील आर्थिक सहकार्यही वृद्धिंगत होत जाणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा