24 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारण“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

राज ठाकरेंचा शरद पवारांना सणसणीत टोला

Google News Follow

Related

छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून या चिन्हाचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. यावरुन राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली.

“तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मागेही यावर बोललो आहे. फुले- शाहू- आंबेडकर यांची नावे घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न त्यांना मागेही एका मुलाखती दरम्यान विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली,” अशी तिखट टीका राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली.

सध्या लोकसभा आणि विधासभेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राजकारणात सर्व ठिकाणी चिखल झाला आहे. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेने भान ठेवायला हवे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचं, इथपर्यंत ठिक आहे. पण जमिनीवर जर अशाप्रकारचे राजकारण होत राहिले, तर ते राज्यासाठी फार पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. भविष्यात जे युवक राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना हेच राजकारण आहे, असे वाटू शकेल. त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहिल, असेही राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळी स्थिती असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे राजकारण पुढं केलं जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार असून या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर पार पडला.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार

बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार

आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल

भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!

“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. सध्याची महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील,” असं यावेळी शरद पवार म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा