32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारण'त्या' बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या पदयात्रेत दिसतात, हे दुर्दैव!

‘त्या’ बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या पदयात्रेत दिसतात, हे दुर्दैव!

रणजित सावरकर यांनी केली राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या टीकेच्या विरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क, दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून राहुल गांधी यांना अटक करा अशी मागणी त्यात केली आहे. तसेच ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात सावरकरांवर टीका केली म्हणून जोडे मारो आंदोलन केले त्यांचेच वारस आज राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सामील होतात यासारखे दुर्दैव नाही, अशीही टीका रणजित सावरकर यांनी केली.

ते म्हणाले की, केवळ शुद्ध राजकारण सुरू आहे. सावरकरांची बदनामी केली तर मते मिळतील, असे यांना वाटते. यात्रेला प्रसिद्धी मिळत नाही. महाराष्ट्रात येऊन आदित्य ठाकरेंची भेट घेतल्यावर राहुल गांधी यांनी वक्तव्य करावे हा योगायोग नाही. बाळासाहेबांच्या पुण्यतिथीपूर्वी दोन दिवस आधी ते असे वक्तव्य करतात. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राहुल गांधी किती किंमत देतात हे यावरून दिसते. जनता हे बघते आहे.

हे ही वाचा:

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

चोरी केल्याच्या संशयावरून कुटुंबाला बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

कमाल झाली! राहुल गांधींच्या विचारांशी सहमत नाही, पण स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेससोबत!

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

 

शिवाजी पार्कला शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केलं होतं. पण आज काँग्रेसशी केलेल्या युतीमुळे त्यांचे धोरण बदलले. त्यांचाच मित्रपक्ष आरोप करतो. आपली युती आहे तर आपल्या नेत्यांचा आपमान करू नका असे सांगता येत नाही.. मग बाळासाहेबांचे पुत्र म्हणण्यात काय अर्थ आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. शरद पवारांविरोधात ट्विट करणाऱ्या मुलीला जेलमध्ये जावे लागते. तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने मुलीला आत टाकले. काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अश्लिल लेख लिहिला होता. त्याविरोधात आपण निवेदन दिले होते पण त्याला उत्तरही दिले नाही. शरद पवार सावरकरांपेक्षा मोठे झाले का?, असा सवालही रणजित सावरकर यांनी उपस्थित केला.

शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार करताना सोबत खासदार राहुल शेवाळेही होते. दादरच्या शिवाजी पार्क पोलिस स्थानकात त्यांनी तक्रार दाखल केली.

रणजित सावरकर यांनी सांगितले की, सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावे नाहीत. महापुरुषांचा अपमान केला जात आहे. ब्रिटिशांनी कधीही म्हटले नाही की सावरकरांनी माफी मागितली. आपल्या देशात दुर्दैवाने हे घडते आहे. मणिशंकर अय्यरने सावरकरांवर टीका केली तेव्हा जोडे मारो आंदोलन शिवसेनेने केले होते. पण आज त्याच पक्षाचे वारस काँग्रेससोबत पदयात्रा काढत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा