29 C
Mumbai
Thursday, April 15, 2021
घर क्राईमनामा 'सेक्युलर' येल प्राध्यापकाचा मोदीद्वेष उघड

‘सेक्युलर’ येल प्राध्यापकाचा मोदीद्वेष उघड

Related

बांग्लादेशमध्ये हिंदूंविरुद्ध सुरु असलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे, तर अनेक हिंदू मंदिरांची विटंबना करण्यात आली आहे. परंतु याकरता देखील काहींना पंतप्रधान नरेंद्र मोदीच दोषी वाटत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अहमद मुशफिक मुबारक. अहमद मुशफिक मुबारक हा अमेरिकेतील येल विद्यापीठातील अर्थशास्त्र शिकवणारा प्राध्यापक. परंतु स्वतःचा अर्थशास्त्र विषय सोडून या प्राध्यापकाने राजकारण आणि समाजकारणाविषयीचे तारे तोडायला सुरवात केली आहे.

“नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये मतं मिळवण्यासाठी सीमेच्या दोन्ही बाजूच्या लोकांना हिंदू-मुसलमान मध्ये विभागण्यात यशस्वी ठरत आहे.” अशी टिपणी अहमद मुशफिक मुबारकने केली होती. मुबारकने हे ट्विट केल्यावर लगेचच त्याला काही ‘नेटिझन्सनी’ तपशील आणि पुरावे देत मुबारक करत असलेले दावे खोटे असल्याचे दाखवून दिले. या सर्व प्रकार घडल्यावर मुबारकने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः ‘सेक्युलर’ असल्याचे घोषित केले.

बांगलादेशचा इतिहास हाच मुळात हिंदू द्वेषाचा राहिलेला आहे. ज्या मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली, ती मुस्लिम लीग आजच्या पाकिस्तानात नाही तर आजच्या बांग्लादेशमध्ये सत्तेत आली होती. तत्कालीन बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर बंगालमध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्त्या आणि बलात्कार सुरु केले. नोआखली या भागात सोऱ्हावर्दी या मुस्लिम नेत्याने हजारो हिंदूंची हत्या केली. डायरेक्ट ऍक्शनच्या नावाखाली कलकत्त्यातदेखील अनेक हिंदूंना मारले आणि हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.

 

हे ही वाचा:

खेड शिवापूर टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

संजय राऊतांना समज द्या, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

याशिवाय १९७१ मधील बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील, बांगलादेशमधील जमात-ए-इस्लामी आणि रझाकारांनी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने लाखो हिंदूंची हत्या केली. १९७०-७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार करण्यात आलेल्या बंगालींपैकी ८०-८५% हिंदू होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,466चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
873सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा