स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सध्या सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागलेले असताना ठाकरे बंधू एकत्र येण्यावरूनही चर्चा सुरू आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांची सोबत नको हे त्यामागील कारण मानले जाते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसला यासंदर्भात उलटा प्रश्न केला आहे.
मतचोरी विरोधात सत्याच्या मोर्चासाठी एकत्र येता मग महापालिका निवडणूक वेगळी का लढवता असा शरद पवार यांचा प्रश्न आहे.
शरद पवार यांनी हा प्रश्न काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर विचारला आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले होते. मारहाण कऱणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या विचारधारेसोबत आपण जाऊ शकत नाही, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत यापुढे वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने ही भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार त्यांच्या या भूमिकेशी सहमत नाहीत.
हे ही वाचा:
गँगस्टर डीके राव आणि दोन जणांवर मोक्का; पोलिस कोठडी २६ नोव्हेंबरपर्यंत
कर्नाटकात डीके शिवकुमार बनणार मुख्यमंत्री? सत्तासंघर्षाचा प्रश्न पोहचला दिल्लीमध्ये
गरीबी निर्मूलनात भारताचे यश उल्लेखनीय!
माओवाद्यांचे आणखी एक षड्यंत्र फेल!
वर्षा गायकवाड यांची आगपाखड
खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनेसेचे नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुजोरा दिला होता. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. त्याआधी, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एकदिवसीय चिंतन शिबिरानंतर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा दिला.
एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून शरद पवार मात्र नाराज नाहीत हे स्पष्ट होत आहे. अर्थात, मनपा निवडणुकीतील ठाकरे बंधुंच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे विचार जुळत असल्यामुळे निवडणुकात आपण एकत्र येऊ असा काँग्रेसचा होरा आहे. दरम्यान, शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. पण, मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही असे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केले आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी सुद्धा काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.







