31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरराजकारण‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!

‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका

Google News Follow

Related

अमरावतीमध्ये आज महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.देशात नवा पुतीन पंतप्रधान मोदींच्या रूपाने तयार होतोय अशी टीका शरद पवार यांनी केली.शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, ‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत.

चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विटकरून शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत. शरद पवारांचं विखारी राजकारण जनतेनं अनुभवलं. त्यामुळेच सुज्ञ मतदारांनी त्यांना नाकारलं.

हे ही वाचा:

वसुंधरा दिनानिमित्त ‘फॉर फ्युचर इंडिया’ चे कांदळवन स्वच्छता अभियान!

सिंगापूरनंतर हाँगकाँगने देखील एमडीएच आणि एवरेस्टच्या मसाल्यांवर घातली बंदी!

जेएनयूमधील ‘फुकट्यां’चा बंदोबस्त होणार!

‘मठ, मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर’

आताही मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ‘पुतीन-पुतीन‘ करत पवारांनी रडगाणं सुरू केलं.शरद पवारांनी मोदीजींना कितीही नावं ठेवली तरी पालघर साधू हत्याकांड, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या निमित्तानं दिसलेला पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा