32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणशिवसेनेची 'शिवधनुष्य' यात्रा महाराष्ट्रात लवकरच

शिवसेनेची ‘शिवधनुष्य’ यात्रा महाराष्ट्रात लवकरच

अयोध्येतून आणणार 'शिवधनुष्य'

Google News Follow

Related

महाराष्ट्रात लवकरच शिवसेना पक्षाची ‘शिवधनुष्य’ यात्रा सुरु होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेला ‘धनुष्यबाण’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात नेणार आहेत. ठाकरे गटाने राज्यभरात शिवसंवाद आणि शिवगर्जना अभियान केले होते ,त्याला उत्तर म्हणूनच लवकरच ‘शिवधनुष्य’ यात्रा महाराष्ट्रात सुरु होणार आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान , माझा धनुष्यबाण घोषवाक्य 

शिवसेना पक्षाला नाव आणि चिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. म्हणूनच मुख्यमंत्री हाच धनुष्यबाण सगळ्या महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात नेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाची मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाण्याची आखणी चालू आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तोच धनुष्यबाण यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळीकडे नेणार आहेत. “महाराष्ट्राचा स्वाभिमान , माझा धनुष्यबाण” असेच या यात्रेचे घोषवाक्यपण असणार आहे.   शिवधनुष्य यात्रेच्या या यात्रेमुळे राज्यातल्या विविध भागांचे दौरे आखण्यात आले आहेत. या सर्व अभियानाची जबाबदारी पक्षातल्या निष्ठावान नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते या अभियानामुळेच सर्व महाराष्ट्रात फिरणार आहेत. त्यात त्यांना आम्हीच शिवसेना असल्याचे सांगितले जाणार आहे.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

दरम्यान , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मास्टरप्लॅन तयार करण्याच्या तयारीत आहेत  असे  सांगण्यात येत आहे. शिंदे पुढील आठवड्यात अयोध्येला जाणार असून त्यांच्यासोबत सगळे मंत्री आणि आमदार पण सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील महंत धनुष्यबाण भेट देणार असून, हाच धनुष्यबाण जे शिवसेनेचे चिन्ह आहे ते सर्व महाराष्ट्र राज्यात फिरवण्यात येणार आहे.

२५ फेब्रुवारीपासून राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. तीन मार्च २०२३ पर्यंत चालणारेअ हे अभियान राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी, आणि युवा सेने चे पदाधिकारी सर्व राज्यांचा दौरा करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयन्त असणार आहे. शिवाय पक्षाची पडझड रोखण्यासाठी उपाययोजन केली जाणार आहे. या यात्रेमध्ये सुभाष देसाई, अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, अशा महत्वाच्या नेत्यांसह शिवसंवाद आणि शिवगर्जना अभियानाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा