26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारण'त्यांनी' ५२ आमदारांना सोडले, पण शरद पवारांना सोडायला तयार नाहीत

‘त्यांनी’ ५२ आमदारांना सोडले, पण शरद पवारांना सोडायला तयार नाहीत

Related

गुलाबराव पाटील यांचा गुवाहाटीतील व्हीडिओ व्हायरल

त्यांनी (उद्धव ठाकरे) वर्षा सोडली. ५२ आमदारांना सोडले, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाही. आम्ही भरपूर केले त्यांच्यासाठी. हे जे मिळालय ते त्यांच्या आशीर्वादाने पण घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम केलं आहे. आयत्या बिळावर नागोबा नाही. पानटपरीवर पाठवू असे राऊत मला म्हणतात. चुना कसा लावतात हे माहीत नाही त्यांना अजून. वेळ येईल तेव्हा लावेन मी चुना, अशा शब्दांत आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटी येथील हॉटेलात आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेचे आमदार असलेल्या गुलाबराव यांनी शेर म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

गुलाबराव पाटील आपल्या समोर बसलेल्या आमदारांना म्हणाले की, मी हे सांगीन की आम्ही एकत्र आहोत, लढाई लढायची आहे. एकनाथ शिंदेंना पुढच्या काळासाठी शुभेच्छा! त्यानंतर त्यांनी एक शेर ऐकविला. ते म्हणाले की,

आदमी टूट जाता है घर बनाने मे

तुम तरस खाते नही बस्ती जला मे

कुछ लगता नही दुश्मनी बढाने मे

उम्र बित जाती है दोस्ती निभाने मे

दोस्तो रहने दो छोडो

दस्तुर निभाते क्यू हो

जवा होकर तुम्हे भी डस लेगा वो राऊत

साप के बच्चे को दूध पिलाते क्यू हो

हे ही वाचा:

आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”

डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

 

गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण ३९ आणि ११-१२ अपक्ष आपण पुरेसे आहोत, सभागृहात डिबेट करायला. जिल्ह्यात आरोप होत आहेत ते होत असताना दुसरीकडे लोकही आपल्या मागे आहेत. आपल्यावर टीका झाली. प्रेतं काढून घेऊ, बाप किती. आमचा संघर्ष माहीत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आम्ही इथे पोहोचलो आहोत. ९२च्या दंगलीत आम्ही पुढे होतो. ३०२, ५६ आम्ही भोगले आहे. संजय राऊत यांना ते माहीत नाही. पक्षाचे ८० टक्के योगदान आहे, पण आपली २० टक्के मेहनत आहे. रात्री १२ वाजता आणचा मोबाईल सुरू असतो. अँब्युलन्सची गरज असते तेव्हा आम्ही असतो. कार्यकर्त्याचं लग्न असतं तेव्हा आम्ही असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा