34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामारोल्स रॉयस मधून फिरणाऱ्या शिवसेना नेत्यावर ३५ हजारच्या वीज चोरीचा गुन्हा

रोल्स रॉयस मधून फिरणाऱ्या शिवसेना नेत्यावर ३५ हजारच्या वीज चोरीचा गुन्हा

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये विविध प्रकारचे आरोप होताना आहेत. यात आता कल्याण विभागातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल ८ कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या या नेत्यावर ३५ हजार रुपयाची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कल्याण भागातील शिवसेनेचे नेते संजय गायकवाड हे आपल्या महागड्या अशा रोल्स रॉयस गाडीमुळे प्रसिद्ध आहेत. अतिशय लग्झरी समजल्या जाणाऱ्या या गाडीची किंमत तब्बल ८ कोटी रुपये असल्याचे समजते. पण याच संजय गायकवाड यांच्यावर वीज चोरी प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आपल्यावर खोटे आरोप होत असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. पण तरीही एफआयआर दाखल केल्यानंतर गायकवाड यांनी दंडासह ३५ हजार रुपयांची रक्कम भरली आहे.

हे ही वाचा:

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

आसाममध्ये येणार नवा गोरक्षण कायदा

मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

गोखलेला न्यायालयाने ठोकले

टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गायकवाड यांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अर्थात एमएसइडीसीएल यांनी तक्रार करून एफआयआर दाखल केली आहे. या वृत्तात सूत्रांच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की एमएसइडीसीएल च्या टीमने गायकवाड यांच्या काही बांधकाम ठिकाणांवर ढाड टाकत निरीक्षण केले. त्यातूनच हा चोरीचा प्रकार त्यांच्या समोर आला आहे. या संपूर्ण छाननीनंतर गायकवाड यांना एमएसइडीसीएल तर्फे गायकवाड यांना ३४ हजार ८४० रुपयांचे बिल पाठवले गेले तर त्यासोबत १५ हजार रुपये दंडाची रक्कम लावण्यात आली. पण तीन महिने उलटून गेले तरीही गायकवाड यांनी ही थकित रक्कम भरली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

एमएसइडीसीएल प्रवक्ता विजयसिंह दुधभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसात दाखल केल्यानंतर गायकवाड यांनी सोमवारी दंडाच्या रकमेसहित संपूर्ण बिलाची रक्कम भरली आहे. पण गायकवाड यांनी या सार्‍या आरोपांचे खंडन केले असून जर मी विजेची चोरी केली होती तर माझ्या साईटवरचे मिटर का नाही हटवले? असा सवाल उपस्थित केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा