30 C
Mumbai
Thursday, April 16, 2026
घरराजकारण‘छत्रपती संभाजीनगर म्हणा, नाहीतर एकही पैसा मिळणार नाही’

‘छत्रपती संभाजीनगर म्हणा, नाहीतर एकही पैसा मिळणार नाही’

संभाजीनगर मनपा स्थायी समिती अध्यक्षांनी सुनावले

Google News Follow

Related

औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात आल्यानंतरही अजून तेथील महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक या शहराला औरंगाबाद म्हणत असल्याचे दिसत आहे. मात्र या महानगरपालिकेतील भाजपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अनिल मकरिये यांनी अशा एका नगरसेवकाला झापले.

स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएमच्या नगरसेवकाने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असा उल्लेख केला होता. पण त्याला मकरिये यांनी तात्काळ रोखले. याचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून शेवटी या नगरसेवकाने आपले शब्द मागे घेतले.

एमआयएमच्या या नगरसेवकाने औरंगाबाद असा उल्लेख केल्यावर मकरिये यांनी बजावले की छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख करा नाहीतर तुमचे एकही काम होणार नाही, एक रुपयाही मिळणार नाही. चुकीचे नाव घेत जाऊ नका, असेही मकरिये म्हणाले. त्यावर त्या नगरसेवकाने आपले शब्द मागे घेत छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला.

हे ही वाचा:

७ वर्षांनंतर भारताची इराणकडून पहिली तेल खरेदी

अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटलाही वाचवले

उत्तर भारतातील नवं कनेक्टिव्हिटी हब: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

.5 फ्रंटवर परिस्थिती चिंताजनक |

यावर एमआयएमचा आणखी एक नगरसेवक म्हणाला की, औरंगाबाद हे ऐतिहासिक नाव आहे, हे घेण्यास काय हरकत आहे. मात्र तो वाद आणखी वाढला नाही. अर्थसंकल्पावर आपण चर्चा करत असून त्यावर प्रथम बोलूया असे म्हणत बाकी नगरसेवकांनी विषयाला लगाम घातला.

औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआचे सरकार आल्यानंतर ही घोषणा ते सरकार पडण्यापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली होती. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद या नावांवरून एमआयएम आणि भाजपा नगरसेवकांमध्ये खटकेही उडतात. या महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला पण त्यावेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग करत या ठरावाचा निषेध केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा