33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामाबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मंगलप्रभात लोढा मैदानात

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मंगलप्रभात लोढा मैदानात

Related

बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या हिंदुविरोधी हिंसाचाराच्या विरोधात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील बांग्लादेश उपायुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केले.

“बांग्लादेशात झालेल्या हिंदू नरसंहारविरोधात तेथील सरकारने कारवाई करावी, तोडफोड झालेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करावे, यामागे असलेल्या प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी मुंबईतील बांग्लादेश उपायुक्तांकडे केली.” असं लोढा म्हणाले.

“आमची मागणी आहे की, या घटनांमागे जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. जी मंदिरं तोडली आहेत, ती पुन्हा बांधली जावीत. ज्यांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे त्यांना बांगलादेश सरकारने मोबदला द्यावा. जिथे बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत, तिथे दोषींवर कठोर कारवाई करावी.” असंही लोढा म्हणाले.

बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसा सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कुमिलामध्ये दुर्गा पूजा उत्सवांच्या दरम्यान कुराणची अपवित्रता केल्याचा आरोप करून हिंदूंच्या कत्तली सुरु झाल्या. रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ल्यातील एका गावात इस्लामिक जमावाने घरांवर हल्ला केला. हिंसाचाराचे कारण, पोलिसांनी सांगितले की, “इस्लामिक कट्टर पंथीयांना कुराणविषयी अपमानास्पद सामग्री असलेली फेसबुक पोस्ट सापडली होती, असे मानले जाते की हे एका हिंदू व्यक्तीने केले आहे.”

हे ही वाचा:

आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

स्थानिक युनियन परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद सदेकुल इस्लाम यांच्या मते, “रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात सुमारे ६५ घरे जाळण्यात आली, परिणामी किमान २० घरे पूर्णपणे जळून खाक झाली. हल्लेखोर इस्लामचा आरोप आहे की, जमात-ए-इस्लामी (जेईआय) आणि त्याची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबिराच्या स्थानिक युनिटचे होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा