30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरराजकारणकाँग्रेसचे सचिन सावंत बनणार शिवसैनिक?

काँग्रेसचे सचिन सावंत बनणार शिवसैनिक?

Related

काल (१९ ऑक्टोबर) सचिन सावंत यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत यांनी आज (२० ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता शिवसेनेत प्रवेश करतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मात्र, याविषयी ते सध्या काहीही सांगायला तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सचिन सावंत यांनी सुमारे १० मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

‘महापौरांचा बंगला हडप केल्यावर तरी स्मारक लवकर होईल, अशी आशा होती’

सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. सावंत यांनी सातत्याने काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम काम केले होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचेही काम त्यांनी केले होते. मात्र, आता झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा