33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरराजकारणसुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे म्हणतात, एकनाथ शिंदेचे विचार पटतात

सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे म्हणतात, एकनाथ शिंदेचे विचार पटतात

vaijnath-waghmare-first-reaction-on-sushma-andhare -

Google News Follow

Related

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून धक्का दिला. त्यापाठोपाठ आता आणखी एक धक्का उद्धव ठाकरे याना बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करून आणखी एक हादरा ठाकरे याना दिला आहे. रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आंनद मठात झालेल्या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली.

लागोपाठ दोन दिवस सुरु असलेल्या शिंदे गटातील इनकमिंगमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
ठाण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात ठाकरे गटातील माजी आमदार योगेश पाटील तसेच पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ नाहीत

सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ नाहीत. त्यांना मीच घडवलं आहे.एकनाथ शिंदे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळेच मी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ भाईंचे विचार आवडले. एकनाथ शिंदे यांचा विद्रोही. क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून पाच सात वर्षापासून मी विभक्त राहतोय अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा