25 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकारणसुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

अंधारेंना सुषमा घडवणारा मीच आहे

Google News Follow

Related

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वाघमारे यांचा हा निर्णय अंधारेंसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जातं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात वाघमारे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. रविवार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वाघमारे यांना शिंदे गटात पदही दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

सुषमा अंधारे आणि वैजनाथ वाघमारे हे गेल्या सात वर्षांपासून विभक्त आहेत. दोघांनीही आंबेडकर चळवळीमध्ये काम केलं आहे. वाघमारे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर टीव्ही ९ च्या माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार पटले म्हणून त्यांच्याकडे जातं असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं आहे. तसेच सुषमा अंधारेंना ठाकरे गटाची तोफ असं म्हणतात, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, तोफ वैगेरे काही नाही. घडवणारा मीच आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच गेल्या सात वर्षांपासून आम्ही विभक्त आहोत असंही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

शुक्रवारी गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याचा धक्का ठाकरे गटाला बसला असून, आता वाघमारे यांच्या निर्णयाने सुषमा अंधारेंना फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा