31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरराजकारण'...तर तेजस्वी यादवांचा राहुल गांधी होईल!'

‘…तर तेजस्वी यादवांचा राहुल गांधी होईल!’

प्रशांत किशोर यांचा मोठा इशारा

Google News Follow

Related

जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (PK) यांनी शनिवारी संकेत दिले की ते आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत राघोपुर मतदारसंघातून लढू शकतात, जो परंपरेने राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि यादव कुटुंबाचा गड मानला जातो. सध्या हा मतदारसंघ तेजस्वी यादव यांच्या ताब्यात आहे.

प्रशांत किशोर म्हणाले, मी राघोपुरला जात आहे. जागेबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. मी लोकांशी भेटून त्यांचे मत जाणून घेईन. उद्या (रविवारी) जन सुराज पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राघोपुर आणि इतर जागांबाबत निर्णय घेतला जाईल. राघोपुरच्या लोकांनी जे ठरवेल, तेच आम्ही करू.”

किशोर पुढे म्हणाले, जर मी राघोपुरमधून निवडणूक लढलो, तर तेजस्वी यादव यांना दोन जागांवरून उमेदवारी घ्यावी लागेल. त्यांची अवस्था राहुल गांधींसारखी होईल.”

त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला, जिथे राहुल गांधींना अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक गडात स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते.

यादव कुटुंबाचा पारंपरिक गड

राघोपुर हा यादव घराण्याचा प्रभावी मतदारसंघ राहिला आहे. लालू प्रसाद यादव यांनी या जागेवरून दोनदा विजय मिळवला. राबडी देवी तीन वेळा येथे विजयी झाल्या. दोघांनीही मुख्यमंत्रीपद भूषवले असताना राघोपुरचे प्रतिनिधित्व केले. तेजस्वी यादव यांनी 2015 आणि 2020 मध्ये ही जागा जिंकली असून, ते उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते राहिले आहेत.

 जन सुराज पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर

पूर्वीच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात काही उल्लेखनीय नावे अशी : भोजपुरी गायक : रितेश पांडे, माजी आयपीएस अधिकारी : आर. के. मिश्रा, जागृति ठाकूर – दिवंगत समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांची नात, के. सी. सिन्हा – माजी कुलगुरू, पाटणा विद्यापीठ आणि नालंदा ओपन विद्यापीठ, डॉ. अमित कुमार दास, शशी शेखर सिन्हा, लाल बाबू प्रसाद, लता सिंग – माजी केंद्रीय मंत्री आर. सी. पी. सिंग यांची कन्या, अधिवक्ता वाय. व्ही. गिरी, प्रीती किन्नर – तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारी उमेदवार.

हे ही वाचा:

हिंद महासागरात भारत दुबई निर्माण करतोय…

इस्रायल-हमास युद्धबंदी करार: युद्धबंदीच्या निरीक्षणासाठी अमेरिकन सैन्य तेल अवीवमध्ये दाखल !

मुंबई पोलिसांसाठी ४५ हजार घरांचा प्रकल्प; गृहविभागाकडून समिती गठित!

टीम इंडियाची पहिली डाव ५१८/५ वर घोषित!

 सामाजिक समतोलावर भर

५१ उमेदवारांमध्ये ११ मागासवर्गीय (OBC), १७ अत्यंत मागासवर्गीय (EBC), ९ अल्पसंख्याक समुदायातून, उर्वरित सामान्य प्रवर्गातील उमेदवार आहेत.

 निवडणुकीची तारीख जाहीर

बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. पहिला टप्पा : ६ नोव्हेंबर २०२५. दुसरा टप्पा : ११ नोव्हेंबर २०२५, मतमोजणी : १४ नोव्हेंबर २०२५

राघोपुरचा सामना ‘हाय-व्होल्टेज’ ठरणार?

प्रशांत किशोर यांनी राघोपुरातून थेट तेजस्वी यादवांना आव्हान देण्याचा इशारा दिल्याने बिहारच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. तेजस्वींसाठी हा ‘प्रतिष्ठेचा’ तर प्रशांत किशोरांसाठी ‘राजकीय पदार्पणाचा’ प्रश्न ठरणार आहे. जर दोघे आमनेसामने आले, तर राघोपुरची लढत अमेठीप्रमाणे राष्ट्रीय लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा