नीट पेपरफुटी प्रकरणावर जंतर मंतर येथे आंदोलन झाल्यानंतर त्याचा राजकीय लाभ प्रत्येक पक्षाने उठविण्याचा प्रयत्न केला. मुंबईत २६ जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एका मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. पण आता कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलनच मागे घेतलेले असल्यामुळे हा मोर्चा होणार का असा प्रश्न होता. याबाबत उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.
धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलनही मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवार २६ जुलैला रोजी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार की नाही असा प्रश्न पडला होता. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे व्यासपीठ उभारून तेथे आंदोलनाला मिळालेल्या यशाचा जल्लोष करण्यात येईल असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
मंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी
२४ वर्षे घरकाम करणाऱ्या नोकरानेच साफ केले सचिन अहिरांचे घर
मनसे आणि उबाठा शिवसेना यांनी २६ जुलै रोजी होणाऱ्या भव्य तिरंगा मार्च आयोजित करण्यात आला होता. मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर हा मोर्चा काढणार की, शिवाजी पार्कला व्यासपीठावर केवळ भाषणे, जल्लोष होणार याविषयी स्पष्ट काही कळलेले नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘ उद्या मुंबईत अभिनंदन मोर्चा घेतला जाणार आहे. शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच जमणार आहोत. जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत, . सरकारला जमिनीवर आणलं आहे. तरुणाईच्या या मोठ्या विजयात दीपकेंचा मोठा वाटा आहे. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं त्याचा जल्लोष झाला पाहिजे.’







