29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारणदोन वर्षांनंतर मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले

दोन वर्षांनंतर मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले

Related

गेल्या दोन वर्षापासून महामारीमुळे सर्वत्र लोकडाऊन होते. त्यावेळी मंत्रालयात देखील सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आता बुधवार, १८ मे पासून म्हणजेच आजपासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

सध्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंधदेखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून मंत्रालायात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार आहे. आजपासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून पास घेऊन सर्वसामान्यांना मंत्रालायत प्रवेश देण्यात येईल.

१८ मार्च २०२० पासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवेश बंद करण्यात आला होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. महामारीत केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व तातडीच्या बैठकांसाठी आमंत्रित केलेल्या व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जात होता.

हे ही वाचा:

संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा खटला

ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

दरम्यान, गृह विभागाकडून नागरिकांना मंत्रालयात प्रवेश देण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्याची अंबलबजावणी आजपासूनच करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रखडलेली प्रशासकीय कामे पुर्ण करण्यासाठी नागरिकांना कार्यालयीन वेळेत मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा