28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामाअनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख ह्यांच्या विरोधात सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुख ह्यांची मुलेही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख ह्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती न्यूज डंकाच्या सूत्रांनी दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.

सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) तपास सुरु करण्यापूर्वी नोंदवलेले पहिले अधिकृत दस्तऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट, जो इसीआयआर म्हणून ओळखला जातो. एखाद्या गुन्ह्यात चौकशी सुरु करण्यापूर्वी जसे पोलिस प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवतात, त्याच प्रकारे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची माहिती मिळताच ईडी ईसीआयआर नोंदवते. त्यामुळे अनिल देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी सुरु होणार आहे. पण देशमुख यांच्या सोबतच त्यांच्या दोन्ही मुलांवरही ईडीची नजर असल्याचे समजत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा

ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवले दीड वर्ष

अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला

मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे शेअर्स असलेली झोडियाक डेलकॉम या कंपनीची चौकशी होण्याची शक्यता आहे. झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकात्याची असून २०१९ साली ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी ती विकत घेतली होती. देशमुख यांचे पुत्र चालवत असलेल्या अयती जेम्स, काँक्रीट रियल इस्टेट, अटलांटिक विस्टा रियल इस्टेट आणि काँक्रीट इंटरप्रासेस या कंपन्यांच्या माध्यमातून २०१९ साली झोडियाक डेलकॉम कंपनी विकत घेण्यात आली होती. या झोडियाक डेलकॉम कंपनीचे व्यवहार याआधी सीबीआयने पडताळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पुन्हा एकदा ईडीकडूनही त्याची तपासणी होऊ शकते असे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा