29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला

अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला

Related

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सात दिवसांचे ‘कडक’ ‘लॉकडाऊन’ जाहीर केले होते. त्याची मुदत आज संपल्याने आयुक्तांनी त्याला पुन्हा एकदा पाच दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नगरमध्ये आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. किराणा तसेच भाजी विक्रीही बंद राहणार असून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहतील.

अहमदनगर जिल्ह्यात दरोरोज साडेतीन ते चार हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रशासनाने ५ मे ते १० मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. तो लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.

कोरोना रुग्णसंख्या दरोरोज झपाट्याने वाढत असल्या बेडची कमतरता भासत आहे. तर नगरला ऑक्सिजन देखील तुटवडा निर्माण झाला होता, सध्या काही प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता झाली असली तरी कधीही कमी पडू शकतो, त्यासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आला आहे. तर इतर खासगी ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?

अनिल देशमुख प्रकरण आता ‘ईडी’कडे

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. काल नाशिक, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जवळपास १७ शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा