25 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणउद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही

Related

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे फेसबुक लाइव्हमध्ये जाहीर केल्यानंतर ते प्रत्यक्षात राजभवन येथे गेले आणि त्यांनी राजीनामा सादर केला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केल्यामुळे आता बहुमत चाचणीची गरजच उरलेली नाही. महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी पत्र लिहून सर्व सदस्यांना तसे कळविले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत तिथे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, नीलम गोऱ्हे, अनिल परब, सुनील प्रभू उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी आपला राजीनामा सादर करत राज्यपालांशी संवादही साधला.

राजेंद्र भागवत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यपाल महोदय यांचे २८ जूनला पत्र मिळाले त्यानुसार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनात उपस्थित राहण्याबाबत सदस्यांना कळविण्यात आले होते. ज्या प्रयोजनासाठी सदर अधिवेशन बोलावण्यात आले होते. ते प्रयोजनच आता आवश्यक नसल्यामुळे ३० जून रोजी होत असलेले अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

न्यायालयाची आणखी एक थप्पड, बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश

‘उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार’

औरंगाबादचे संभाजीनगर अचानक का सुचले ?

मविआ सरकार कोसळलं; उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

 

त्याआधी, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणी घ्यावी लागेल हा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रात्री ९.३० वाजता आपला राजीनामा सादर केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता फ्लोअर टेस्ट म्हणजे बहुमत सिद्ध करण्याची गरज उरलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा