25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरराजकारणविधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

२८८ जागांसाठीचे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

Google News Follow

Related

राज्याच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. त्यामुळे २८८ जागांसाठीचे उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदारांचा निर्णय मतदानयंत्रात बंद होणार आहे. सकाळपासून राज्यात लोक मतदानासाठी बाहेर पडले असून राजकीय नेते मंडळी, कला विश्वातील दिग्गज, क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यंदाही निवडणुकीच्या रिंगणात असून ते नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत. सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो, त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर सर्वांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन यावेळी फडणवीस यांनी मतदारांना केलं.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले. शिवाय राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमित याच्यासोबत २० दिवस प्रचार केला आहे. लोकांनाही एक चांगला उमेदवार उभा आहे याचा आनंद आहे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. राज ठाकरे यांचे पुत्र अमीर ठाकरे हे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कांदिवली पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनीही गोरेगाव पूर्व येथील दूधसागर सोसायटीत मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती कार आणण्यासाठी राज्यभरातील लोक उत्सुक आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

सोमेश टोचतो, सज्जादमुळे गुदगल्या होतात हेच तर परिवर्तन आहे…

मूल्य आणि तत्त्वे कमी झाल्यामुळेच ‘आप’ला सोडचिठ्ठी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला असून महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा अधिकार बजावला आहे. अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. सचिनने संपूर्ण कुटुंबासह मतदान केलं. सर्वांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणाता मतदान करा, मतदानाचा हक्क जरूर बजावा, असं आवाहन सचिनने नागरिकांना केलं आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसामान्यांसह रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं. अक्षय कुमार यानेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा