27 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरदेश दुनियामुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वेस्टमिडलँड्सचे महापौर अँडी स्ट्रीट यांची 'वर्षा' बंगल्यावर सदीच्छा भेट.

Google News Follow

Related

मुंबई आणि बर्मिंगहॅम दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले. वेस्टमिडलँड्सचे महापौर अँडी स्ट्रीट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत दोन्ही राज्यांमधील गुंतवणूक आणि सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. लंडन जवळील वेस्टमिडलँड हे राज्य वसलेले असून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातले मोठे हब म्हणून ओळखले जाते. तसेच इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाच्या दृष्टीने नवीन गुंतवणूक करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. तसेच मुंबई ते बर्मिंगहॅम अशी विमानसेवा सुरू केल्यास पर्यटन क्षेत्राला सुद्धा चालना मिळू शकते. अशा बाबी स्ट्रीटयांच्या निदर्शनास आणून दिल्या.

हे ही वाचा:

फणसाडच्या अभयारण्यात परदेशी गिधाडांचे ‘रेस्टॉरन्ट’

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

तसेच या सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्ठमंडळाला दिली. तसेच दोन देशांमप्रमाणे दोन राज्यांमध्ये गुंतवणूक विषयक संधी अजून वाढाव्यात अशी मागणी वेस्टमिंडलँडचे महापोर अँडी स्ट्रीट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली. तसेच महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग, शिवडी येथील न्हावाशेवा सी-लिंक असे अनेक नवे मोठे प्रकल्प उभे राहत असून त्यामुळे गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा